Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमिशन मालेगाव फत्ते करणार; पोस्टिंग नाकारणार्‍या डाॅक्टरांना सस्पेंड करा; आरोग्यमंत्री टोपे

मिशन मालेगाव फत्ते करणार; पोस्टिंग नाकारणार्‍या डाॅक्टरांना सस्पेंड करा; आरोग्यमंत्री टोपे

नाशिक । प्रतिनिधी

मालेगावमध्ये करोनाची परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेली नसून आवश्यक ती सर्व मदत यंत्रणेला दिली जात आहे. या ठिकाणी शंभर डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून काही डाॅक्टर अजून सेवेत रुजु झाले नाही. पोस्टिंग नाकारणारे डाॅक्टर पुढील २४ तासात रुजू न झाल्यास जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना सस्पेंड करावे, असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. तसेच, मिशन मालेगाव फत्ते करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मालेगावमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मालेगावमध्ये अतिशय घनदाट लोकवस्ती असून त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढला आहे.

मालेगावमध्ये जे १२ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले ते त्यांनी उपचार घेण्यास टाळाटाळ केल्याने झाले. मोठया प्रमाणात अज्ञानामुळे मालेगावात करोनाचा संसर्ग वाढला आहे.

करोना व्यक्तिरिक्त इतर संसर्गाने आजारी रुग्णांची संख्या मोठी आहे. इतर डाॅक्टरांनी त्यांच्या अोपीडी सुरु न केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा त्यांनी दिला.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार्‍या पथकांना पीपीई किट दिली जाईल. मालेगावात काम करणार्‍या टिमला पोर्टेबल कीट दिली जाईल. मालेगावात करोना संशयितांना होम क्वारंटाईन करणे शक्य नाही.

त्यांना आयसोलेशन क्वारंटाईन केले जाईल. मालेगावमध्ये करोनाला अटकाव घालण्यासाठी बेस्ट डाॅक्टरांची टिमची मदत घेतली जाईल. धर्मगुरुंची मदत घेऊन जनजागृती केली जाईल. नाॅन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी २०० बेडचे हाॅस्पिटल राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या