Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पुणे महामार्गावरील अपघातात नाशिकचे दोघे ठार; चार जखमी

Share

संगमनेर | प्रतिनिधी

पुणे-नाशिक महामर्गावर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला कर्जुले पठार शिवारात अपघात झाला. ही घटना आज सकाळी  नऊच्या सुमारास घडली. यात नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील दोन कर्मचारी जागीच मृत्यू झाले.  तर चार जण गंभीर जखमी झाले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहा कर्मचारी जुना आग्रा रोड त्र्यंबक नाका येथून शासकीय टेम्पो (एमएच. १५ एबी. ५९ ) मधून  पुण्यातील येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी आणण्यासाठी सकाळी निघाले होते.

चालक डी. टी. देवरे टेम्पो चालवित होते. संगमनेर तालुका हद्दीतील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गवर कर्जुले पठार शिवारात एका वाहनाने त्यांच्या टेम्पोला हुल दिली.

त्यामुळे टेम्पो उलटूल्या मागे बसलेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. यात अनिल सोपान कोळी व जगन्नाथ पोपट सणधन दोन्ही राहणार नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिस व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टेम्पोतील मृतांना बाहेर काढण्यात आले.

तर गंभीर जखमी झालेले मुज्जाहुद्दीन शेख, रवींद्र मिसाळ, नितीन सोनवणे, डी. टी. देवरे यांना उपचारार्थ संगमनेर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी संगमनेरला धाव घेतली व सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!