Type to search

केद्राई फाट्यावर अपघात; पाच वर्षांचा मुलगा जागीच ठार, आई-वडील जखमी

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

केद्राई फाट्यावर अपघात; पाच वर्षांचा मुलगा जागीच ठार, आई-वडील जखमी

Share

चांदवड | प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता ओलंडणाऱ्या मोटारसायकलला कारने धडक दिल्याने पाच वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला तर आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास केंद्राई फाटा येथे ही घटना घडली.

खालप येथील काही मंडळी धार्मिक कार्यक्रमा निमित्त केद्राई ता. चांदवड येथे आले होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मुंबई आग्रा महामार्गावर दीपक मोरे व पत्नी सोनाली हे मुलगा गौरव यांच्यासह रस्ता ओलांडत होते.

त्यांच्या एम.एच. ४१ एन. ५७७५ या दुचाकीस चांदवडच्या दिशेने येणारी कार क्रमांक एम. एच. ०५ सिव्ही ३५५५ हिने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.

या अपघातातील जखमी भीषण धडकेने काही फूट दूर जाऊन कोसळले. अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांनी जखमी दीपक व सोनाली मोरे या पती पत्नीस प्रथम चांदवड व नंतर नाशिक येथे अधिक उपचारासाठी दाखल केले. या घटनेत पाच वर्षीय गौरव मोरे या मुलाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेबाबत सुनील यादव सूर्यवंशी राहणार खालप ता. देवळा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात वडाळीभोई पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!