Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Gallery : भावडबारी-देवळा रस्त्यावर बस-ट्रकचा अपघात; चार ठार, १५ च्या वर जखमी

Share

नाशिक | नेहमीच अपघाताची शृंखला सुरु असलेल्या विंचूर प्रकाशा मार्गावर पुन्हा एकदा नंदुरबार-नाशिक बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशी जागीच ठार झाले तर १५ पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, अपघातात बसची चालकाच्या बाजूला असलेली एक पूर्ण साईट अर्धावर चिरली गेली होती. अपघातानंतर अनेक मृतदेह रस्त्यावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले होते.

अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मृतदेह देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून प्रचंड गर्दी याठिकाणी जमली आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चांदवड देवळा मतदार संघाचे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी करत जखमींची विचारपूस केली. उपचाराच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!