सिन्नरजवळ पांढुर्ली घाटात चार वाहनांचा अपघात; संगमनेरचे जोडपे ठार

0

सिन्नर ता. ५ : सिन्नर घोटी महामार्गावर पांढुर्ली घाटाच्या पायथ्याशी घोरवड गावाच्या शिवारात चार वाहने एकावर एक धडकून अपघात झाला. त्यात दोन जणांचा चिरडून मृत्यू झाला.

घोरवड घाट रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेत्यांचे स्टॉल असून घाट उतरताना या  स्टॉलवर अनेक वाहने खरेदी साठी थांबतात. दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घाट उतरून घोटीकडे जाणाऱ्या ट्रकचालकाने अचानक आपल्या वाहनाचा वेग कमी केला.

त्यामुळे पाठीमागे असणारा टेम्पो त्यावर धडकला. टेम्पो मागे दुचाकीवरून जोडपे जात होते. हे जोडपे दुचाकीसह टेम्पोवर धडकून रस्त्यावर पडले.

त्यापाठोपाठ चालणाऱ्या टँकरच्या चाकाखाली चिरडून दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

दादापाटील नामदेव घुले ( वय ५२) आणि मीना दादापाटील घुले (वय ४६), रा. चिखणी, ता. संगमनेर, जि. नगर अशी मृतांची नावे आहेत.

सदरचे ठिकाण अपघातप्रवण असून तेथे असणाऱ्या वळणावर अंदाज येत नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत.

LEAVE A REPLY

*