Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर बोगद्याजवळ ऑईलचा ट्रक पुलावरून खाली कोसळला

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी : इंदिरा नगर बोगद्याजवळ मुंबईहून नाशिक कडे येणारा मालवाहतूक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली कोसळला मात्र या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवारी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येणारा मालवाहतूक करणारा ट्रक क्रमांक (एम.पी.०७.एच. बी ८१४२) याच्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंदिरा नगर बोगद्याजवळ ट्रक उड्डाण पुलावरून खाली कोसळला.

त्यात ट्रक चालक सदर कुमार श्रीवास्तव वय (४०), दीपेन शर्मा वय (३९) शमशाद खान (४३) तिघेही रा. मध्यप्रदेश हे किरकोळ जखमी आहेत.

या ट्रकमध्ये ऑईलचे ड्रम असल्याने ट्रक कोसळताच हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पसरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याने तात्काळ घटनास्थळी वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी येऊन नियंत्रण मिळवले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!