Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निफाड : सबसिडी मंजूर करण्यासाठी मागितली साडेपाच हजाराची लाच; अनुरेखक जाळ्यात

Share

नाशिक | प्रतिनिधी

शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचन प्रकरणे सबसिडीसाठी पाठविण्यात आले होते. हे प्रस्ताव मंजूर करून सबसिडी मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार 700 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी निफाड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनुरेखकास रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी निफाड येथे सापळा रचून कारवाई केली. वसंत लक्ष्मण ढिकले असे या अनुरेखकाचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदार यांचे ठिबक सिंचनचा व्यवसाय आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सबसिडीची प्रस्ताव एकत्र करून ते मंजूर करावेत याकामी अनुरेखकाने संबंधित व्यावसायिकाकडे लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली होती. त्यानंतर नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रभाकर घाडगे यांनी निफाड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार वसंत लक्ष्मण ढिकले या अधिकाऱ्यास रंगेहाथ कारवाई करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!