Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक सिव्हीलमधून पळून गेलेला रुग्ण सापडला; निफाड तालुक्यातून घेतला ताब्यात

नाशिक सिव्हीलमधून पळून गेलेला रुग्ण सापडला; निफाड तालुक्यातून घेतला ताब्यात

नाशिक |  प्रतिनिधी 

कोरोना संशयित असलेल्या शासकीय रुग्णालयातून फरार झालेला रुग्णाला निफाडमधून ताब्यात घेण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

- Advertisement -

वैजापूर (जि.औरंगाबाद) येथील असल्याचे सांगणाऱ्या 19 वर्षांचा  कोरोना संशयीत रुग्णाला शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.

त्याचा स्वब अहवाल निगेटिव्ह आलेला होता. त्याचा छातीचा एक्स-रे काढण्यासाठी नेत असताना तो पळून गेला होता. दरम्यान, पलायन केलेला संशयित शोधण्यासाठी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी कंबर कसत शोधमोहीम राबविली. अवघ्या तीन तासांच्या अंतरात या रुग्णाला निफाड तालुक्यातील विंचूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हा रुग्ण चेस्ट एक्स-रे काढण्यासाठी नेत असताना फरार झाला होता. अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याबाबतच्या सूचना जिल्हा रुग्णालय आणि पोलीस यंत्रणेला देण्यात आल्याचे मांढरे यांनी सांगितले.

हा रुग्ण आपल्या जिल्ह्यातील रहिवासी नसून अशाच प्रकारे पत्ते बदलत तो एका ठिकाणी आढळून आलेला होता. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव आल्याने त्याच्यापासून कुठलाही धोका नाही. तरीदेखील रुग्ण फरार झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यापासून धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे पोलीस यंत्रणा, रुग्णालय प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

दरम्यान, खाजगी मोटरसायकलवर लिफ्ट घेऊन हा व्यक्ती पळून गेला असल्याचे दिसून आले आहे. त्याला विंचूर येथून ताब्यात घेण्यात आलेले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

अनोळखी व्यक्तींना या कालावधीत खरं तर कुणीही लिफ्ट देणे अभिप्रेत नाही. यापुढे ‘पळून जाण्यासाठी मदत केल्याचा’ गुन्हा दाखल करण्यात येईल अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या