नाशिक : शहरातील १४ प्रतिबंधित क्षेत्रात सापडले ६३ संशयित, ९३ हाय रिस्क कॉन्टॅक्ट

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोना बाधीतांचा आकडा वाढत जाऊन आज 20 झाला आहे. तसेच दिवसेंदिवस शहरात संशयित रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने नाशिककरांची चिंता वाढली असुन आत्तापर्यतच्या शहरातील करोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींचा आकडा पुन्हा 93 पर्यत गेला आहे. शहरातील 14 प्रतिबंधीत विभागात सुरू असलेल्या आरोग्य सर्व्हेक्षणात आढळुन आलेल्या 63 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील करोना बाधीतांचा आकडा 511 पर्यत गेला असुन यात मालेगांव महापालिकेतील आकडा 417 च्यावर गेला आहे. तसेच नाशिक शहरातील आकडा आता 20 पर्यत गेला असुन एका महिलेचा मृत्यु झाल्याचे मंगळवारी समोर आले होते.

नाशिक शहरात पहिला रुग्ण 6 एप्रिल 2020 रोजी सापडल्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर म्हणजे 7 मे पर्यत शहरातील आकडा आता 21 पर्यत गेला आहे. शहरात ज्या ज्या भागात करोना बाधीत रुग्ण आढळले, अशा चौदा भागात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत भाग घोषीत केला असुन आजही शहरातील नाशिक पुर्व विभागातील समतानगर टाकळीरोड या भागात करोना बाधीत आढळून आल्याने या शहरातील पंधरावा प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

नाशिक शहरात महिनाभरात करोनाची चौदा प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाल्यानंतर याठिकाणी घरोघरी जाऊन सुरू होणारे 14 दिवसाचा आरोग्य सर्व्हेक्षण अजुनही सुरूच आहे. यापैकी पाच ठिकाणचे सर्व्हेक्षण संपले असुन उर्वरित 9 ठिकाणी सुरू असलेल्या आरोग्य सर्व्हेक्षणासाठी डॉक्टरांचे 45 पथके कार्यरत असुन आशा वर्करकडुन आरोग्य तपासणी केली जात आहे.

या 2704 घराच्या सर्व्हेक्षणात 2679 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असुन 10 हजार 352 लोकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणात उत्तमनगर भागात 14, बजरंगवाडीत 18, माणेक्षानगर 6 अशाप्रकारे एकुण 14 प्रतिबंधीत क्षेत्रात 63 संशयित आढळून आल्यानंतर त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसेदिवस रुग्ण वाढत असल्याने आता बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचा आकडा 93 आणि कमी जोखमीच्या व्यक्तीचा आकडा 355 इतका झाल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *