Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरीतून सहाव्या फेरीअखेर भारती पवार यांना ६० हजार मतांची आघाडी

Share

नाशिक | प्रतिनिधी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासून भाजप उमेदवार भारती पवार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

मतमोजणीच्या सहाव्या फेरीअंती भारती पवार यांना १ लाख ५५ हजार ९४९ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांना ९५ हजार ६०७ मते मिळाली आहेत.

तर मार्क्सवादी काम्युनिष्ठ पक्षाचे आमदार जीवा पांडू गावीत ३२ हजार १४९ मते मिळाली आहेत. त्यामुळे दिंडोरी मतदार संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुहेरी चुरस बघायला मिळत असून आगामी फेरीत कोण किती वरचढ ठरेल हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सहाव्या फेरीअखेरची आकडेवारी 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सहाव्या फेरीअखेर भाजपाच्या भारती पवार 60 हजार 342 मतांनी आघाडी घेतली आहे. पवार यांना सहाव्या फेरीअखेर 1 लाख 55 हजार 949 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना  95 हजार 607 तर आमदार जे पी गावित यांना 32149 मते मिळाली आहेत. या फेरीअखेर भारती पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!