Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : वर्षभरात ५८ हजार प्रवाशांचा विमानप्रवास; कार्गोसेवाही २०६ मॅट्रीक टनावर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

‘उडे देश का आम आदमी’ या केंद्र सरकारच्या महात्वाकांशी ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नाशिकच्या विमानसेवेला वर्षभरात प्रचंड प्रतीसाद मिळालेला आहे. एका आकडेवारीनुसार ५८ हजार ०५८ प्रवाशांनी विमानप्रवास केलेला आहे. तर एकूण २०६.१ मॅट्रीक टन कार्गोची वाहतूक झालेली आहे.

यामध्ये सर्वात जास्त प्रवाशी नाशिक दिल्ली विमानसेवेला मिळाले. दुर्दैवाने जेट आर्थिक अडगळीत अडकल्यामुळे ही सेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. मात्र, जेटचे स्लॉट आता एअर इंडियाला मिळणार असून नाशिक दिल्ली विमानसेवा पुन्हा एकदा पूर्ववत होणार आहे.

तर नाशिक अहमदाबाद आणि नाशिक हैद्राबाद विमानसेवेसाठी अलायन्स एअर या एअर इंडियाच्या कंपनीकडून यशस्वी सेवा सुरु आहे. ही सेवा ७२ आसनांच्या विमानाने देण्यात येत असून ७० ते ८० टक्के प्रवासी संख्या नियमित मिळत आहे.

तर अहमदाबादसाठी ट्रुजेटकडून विमानसेवा दिली जात आहे. या सेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकहून जाणाऱ्या आणि दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे या विमानाला कार्गाेची सेवा उपलब्ध असल्याने नाशिकहून जुलै २०१८ पासून मे २०१९ पर्यंत ५८ हजार ५८ प्रवाशांची वाहतूक केली आहे तर २०६. १ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली आहे.

या सेवेमुळे केवळ नाशिककरांना देश-विदेशातील प्रवासच नव्हे, तर येथील भाजीपाला, फळे, फुले यांच्याकरिता जागतिक बाजारपेठ काही तासांवर आली आहे. पहिल्याच वर्षी या विमानसेवेला सरासरी ८० ते ९० टक्के बुकिंग मिळाले आहे.

लवकरच एअर इंडियाची दिल्लीसाठी, इंडिगोची -बंगलोर, भोपाळ, हिंदन, स्टार एअरची – बेळगावी, स्पाईस जेटची – गोवासाठी विमानसेवा सुरु होणार आहेत. त्यामुळे नाशिकहून जाणारया आणि नाशिकला बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे.

कार्गोची सेवा महत्वाची 

नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत जाईल. मात्र, कार्गो जर नियमित मिळाले तर विमानसेवेला अतिरिक्त फायदा यातून होऊ शकतो. यामुळे प्रवाशांसह कार्गोसेवाही अधिक महत्वाची मानली जात आहे.

ओझर नाईट लंॅडिंगमुळे दुहेरी फायदा

खासगी हवाई वाहतुकीसाठी ओझरला नाईट लंॅडिंग सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जी विमाने मुंबईत पार्किंगअभावी अहमदाबाद किंवा इतरत्र जात होती त्यांना नाशिक विमानतळ हा सोयीचे ठिकाण होऊ शकते. यामुळे नाशिक मुंबई विमानसेवेळाही फायदा होऊ शकतो असे तज्ञ सांगतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!