Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नरला ५५ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरु

Share

सिन्नर | प्रतिनिधी 

सिन्नर तालुका पुन्हा एकदा खुनाच्या घटनांनी हादरला आहे. गेल्या तीन दिवसांत दुसरी  खुनाची घटना झाल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील विंचूर दळवी येथे ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आज सकाळी उघडकीस आली.

महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, घरात महिलेचा खून करून रस्त्यालगत टाकत अपघाताचा बनाव रचल्याचा संशय पोलिसांना येत असून पोलीस तपासाला गती दिली आहे.

अधिक माहिती अशी की, विंचूर दळवी येथील हिराबाई नामदेव भोर (वय ५५) यांचा मृतदेह आज सकाळी रस्त्याच्या कडेला आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

महिलेच्या चेहऱ्यावर वार झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच घरातून मृतदेह फरफटत नेल्याचेही प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे हत्या करून अपघाताचा बनाव केल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. मृत महिला वृद्ध पतीसोबत एकटीच राहत असल्याची माहिती मिळते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!