Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमालेगावमध्ये आणखी ७ रुग्ण पॉझिटिव्ह; जिल्ह्यात एकूण ५५ कोरोनाबाधित

मालेगावमध्ये आणखी ७ रुग्ण पॉझिटिव्ह; जिल्ह्यात एकूण ५५ कोरोनाबाधित

नाशिक । प्रतिनिधी

मालेगावमध्ये पुन्हा आज सायंकाळी सात अहवाल कोरोना बाधित सिद्ध झाले आहेत.यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण नऊ कोरोनाबाधित रुग्ण सिद्ध झाले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असल्याने चिंता वाढली आहे. आज रात्रीच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण ५५ वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगाव शहर, नाशिक ग्रामीण मधील तालुके आणि नाशिक शहराचा समावेश आहे.

- Advertisement -

आज सकाळी मालेगाव शहरात कोरोना बाधित एक रुग्ण आढळून आला होता. या रुग्णावर ह्रदयाची शस्रक्रिया करावी लागणार असल्यामुळे नाशिक शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा सात रुग्ण कोरोनाबाधित सिद्ध झाले आहेत. हे रुग्ण मागील कोरोना बाधितांच्या संपर्कातील असून त्यांना संस्थात्मक स्थानबद्ध करण्यात आलेले होते.

आज मालेगावमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ४१ वर्षीय बाधित पुरुष रुग्ण मालेगाव शहरातील आहे. ३६ वर्षीय पुरुष नयापुरा भागातील आहेत. १४ वर्षीय मुलगी कमाल पुरा भागातील आहे. १५ वर्षीय दोन मुले एक दातारनगर तर दुसरा जामा मशीद परिसरातील असल्याचे समजते. २३ वर्षीय महिला इस्लामाबाद परिसरातील तर २५ वर्षीय तरुण बेलबाग परिसरातील असल्याचे समजते

आजच्या आकडेवारीनुसार मालेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. नाशिक शहरात पाच तर जिल्ह्यातील इतर तालुक्यात तीन रुग्ण कोरोना बाधित आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी पन्नाशी पार करून ५५ वर पोहोचली आहे.

नामपूर रुग्णालयातील स्टाफमधील २८ अहवाल निगेटिव्ह

मालेगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारयाला कोरोनाची लागण झाल्यानंतर मोसम खोऱ्यासह परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे नमुने आज प्राप्त झाले असून २८ रुग्णालयातील स्टाफ मेम्बर्सचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संसर्गाचा फैलाव हॉस्पिटलमध्ये  झाला नसल्याचे पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या