देवळा : वाजगाव येथे प्रौढाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
Share

वाजगाव | वार्ताहर
तालुक्यातील वाजगाव येथील रमण उर्फ आण्णा पोपट देवरे (वय ५३) यांनी गावाशेजारील विहिरीत सकाळी ११ च्या सुमारास उडी घेवून आत्महत्या केली.
सदर घटनेची माहिती पोलिस पाटील निशा देवरे यांना समजताच त्यांनी देवळा पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली. पोलीस नाईक चंद्रकांत निकम व पो.हवालदार सुनील पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
विहिर खोल असल्याने तसेच मृतदेह तळाशी गेल्यामुळे मृतदेह काढण्यासःती शर्तीचे प्रयत्न सुरु होते. अखेर लोहोणेर येथील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनाही मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले.
दरम्यान, बघ्यांची गर्दी कमी झाल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास लोखंडी गळ तयार करून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. याप्रकरणी देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मयत रमण यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.