शाओमीचा ‘Red MI Note 7’ लॉन्च; 48 मेगाफिक्सल कॅमेरा, किंमत अवघी १० हजार रुपये

0
नवी दिल्ली : बजेट स्मार्टफोन साठी प्रसिद्ध असलेल्या शाओमीने कमी किंमतीत अनेक फीचर्स असलेले स्मार्टफोन  लॉन्च करत मार्केट काबीज केले आहे.
शाओमीने नुकताच रेड मी नोट सेव्हन हा स्मार्टफोन ४८ मेगाफिक्सल  कॅमेरा क्वालिटीसह अगदी कमी किंमतीत ग्राहकांना देऊ केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेड मीच्या स्मार्टफोनची जबरदस्त चर्चा होऊ लागली आहे.

रेड मी च्या सर्वच स्मार्टफोनमध्ये बॅटरी चांगल्या बॅकअपसह दिली जात आहे. त्यामुळे अनेकांची पसंती शाओमीला मिळत आहे.

पहिल्यांदाच शाओमीने 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या फोनसोबत सर्वात जास्त मेगाफिक्सल कॅमेरा देण्याचा इतिहासच जणू नोंदला आहे. या मॉडेलचे नाव रेड मी नोट सेव्हन असे आहे.  या स्मार्टफोनचा कॅमेरा ४८ मेगाफिक्सल तर रेयर कॅमेरा १३ मेगाफिक्सल आहे.

रेड मी नोट ७ या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.३ इंच आहे. फोनच्या वरच्या भागावर वॉटरड्रॉप नॉच आहे. यात क्वॉलकॉम स्नैपड्रैगन ६६० प्रोसेसर आहे.

फोनची बटरी ४००० mAh ची आहे. ज्यामुळे कंपनीने दीड दिवस बैटरी टिकेल असा दावा केला आहे.  यात Type-C USB चार्जिंग ऑप्शन देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम क्विक चार्ज 4.0 सपॉर्टबरोबरच हेडफोन जैक देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन नुकताच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

फोनची किंमत : 

या फोनची किंमत १० हजारापासून सुरु झाली असणार आहे. यात ३ जीबी RAM आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे.

तसेच चार जीबी RAM आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईल साडेबारा हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच सहा जीबी RAM आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत साडेचौदा हजाराच्या आसपास असल्याचे समजते.

दरम्यान, भारतात हा फोन कधी उपलब्ध होईल याबाबत अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही. परंतु, १४ जानेवारीपासून हा फोन चीनच्या बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

LEAVE A REPLY

*