Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राजस्थानला जाणारे ४७ प्रवासी मालेगावमध्ये पकडले; प्रत्येकाची होणार तपासणी

Share
Malegaon

मालेगाव | प्रतिनिधी

कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरू आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे येत्या तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जाहीर केला. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजुरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

अत्यावश्यक सेवा असा फलक लावून मालट्रक मधून मजुरांना परराज्यात स्थलांतरित करण्याचा प्रयत्न नाकाबंदी वरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे असफल ठरला. सदर मालट्रक जप्त करत 47 परप्रांतीय मजुरांची मंगल कार्यालयात रवानगी करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात ट्रक चालकासह या मजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अडवू नये यास्तव ट्रकच्या दर्शनी भागावर अत्यावश्यक सेवा असा फलक देखील लावण्यात आला होता. शिर्डी मनमाड मार्गे हा ट्रक मालेगाव येथे मनमाड चौफुलीवर रात्री येऊन पोहोचला.

मात्र, करुणा रुग्ण संख्या वाढत असल्याने मालेगाव च्या सर्व सीमा सील करण्यात आले आहे. शहरात प्रवेश अथवा बाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. वाहनांची देखील खिल कसून चौकशी पोलीस करत आहेत. हा ट्रक येतच पोलिसांनी ट्रकचालकास विचारपूस केली असता तो समाधान कारक उत्तर देत नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ताडपत्री काढून ट्रकची तपासणी केली. यानंतर जवळपास 47 मजूर दाटीवाटीने ट्रकमध्ये बसल्याचे आढळून आले.

पुणे परिसरात काम करत असलेले हे 47 मजूर मालट्रक क्रमांक आर जे 09 जीबी 67 25 मधून छुप्या पद्धतीने मध्यप्रदेश राजस्थान व छत्तीसगड येथे जाण्यास निघाले होते. सदर मालट्रक पोलिसांनी ताब्यात घेत नियंत्रण कक्षात हलविला. रात्रभर मजुरांना तेथेच थांबवले गेले. दुपारी या मजुरांना जेवण देत पोलिसांनी त्यांची रवानगी लोणवाडे शिवारातील एका मंगल कार्यालयात केली आहे.

दरम्यान, या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे लॉंग डाऊन असल्यामुळे पुढील आदेशापर्यंत त्यांना मंगल कार्यालयातच ठेवले जाईल अशी माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिली

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!