नाशिक शहरातील ४१८ गणेश मंडळांचे अनधिकृत वीज कनेक्शन

0

नाशिक दि. १६ प्रतिनिधी ।  महापालिकेने नाशिक शहरात ६३३ मंडळांना परवानगी दिली आहे. अवघ्या २१५ मंडळांनीच तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. इतर ४१८ मंडळांनी वीजजोडणी घेतली नसून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. कोणत्याही क्षणी या मंडळांवर वीज वितरणकडून कारवाई केली जाऊ शकते.

महापालिकेला गणेश मंडपासाठी 661 अर्ज मिळाले होते. यापैकी महापालिकेने 28 मंडळांना परवानगी नाकारत 633 मंडळांना परवानगी दिली होती. त्यानंतर या गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीजजोडणी घेण्याचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, अवघ्या २१५ मंडळे यासाठी सरसावले असून त्यांनीची अधिकृत वीजजोडणी घेतलेली आहेत.  ४१८ मंडळांनी वीजजोडणी घेतलेली नसून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे.

जर अनधिकृत वीज जोडणी असेल तर कारवाई होणारच हे माहिती असूनदेखील अनेक मंडळांनी याकडे दुर्लक्ष केले.   दरम्यान, गणेश मंडळांवर कारवाई केल्यानंतर मंडळ आकारलेला दंड भरून देतात.

तसेच धार्मिक भावना, राजकीय व्यक्ती यांच्यामुळे कारवाईचे स्वरूप मर्यादित ठेवावे लागते अशी माहिती महावितरणमधील विश्वसनीय सूत्रांनी देशदूत डिजिटलशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

*