Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये पाच वाजेपर्यंत ४१.३७ तर दिंडोरीत ४६.७ टक्के मतदान; शेवटचा एक तास शिल्लक

Share

नाशिक | प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.29) नाशिक मतदारसंघासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकमध्ये ४१.३७ तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात ४६.०७ टक्के मतदान झाले.

मतदानासाठी अवघा अखेरचा एक तास शिल्लक असून झोपडपट्टी भागातील मतदारसंघातील गर्दी नेहमीप्रमाणे वाढली आहे.

मोठ्या प्रमाणात जनजागृती करुनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र पहायला मिळाले. सलग सुट्टयांमुळे नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविण्याऐवजी पर्यटनाला पसंती दिली.

शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदानाचा जोर अधिक होता. मात्र दुपारच्या तळपत्या उन्हात नागरिक घरातून बाहेर न पडल्याने टक्केवारी घसरली. सायंकाळी पाच वाजले तरी नागरिक घराबाहेर मतदानासाठी पडण्याचे नाव घेतना दिसून आले नाहीत.

सकाळी काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे तुरळक प्रकार घडले. हा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळित सुरु होती.

मतदारांनी भर उन्हात मतदानासाठी बाहेर पडायचे टाळत दुपारी 12 वाजेच्या आत मतदान करणे पसंत केले. त्यामुळे मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने मतदानासाठी वेळ लागत होता.

पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजाविणार्‍या नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. तरुण मतदारांनी गर्दी केली होती. सेल्फिकाढून ते मतदानाचा आनंद शेअर करत होते. मात्र, दुपारनंतर उन्हामुळे मतदान केंद्रांवर मतदानचा हक्क बजाविण्यासाठी तुरळक गर्दी होती. त्यानंतर दुपारी चार वाजेनंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली होती.

सर्व केद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे मतदानाला गालबोट लागेल असे प्रकार न घडता शांततेत प्रक्रिया पार पडली. नाशिकमध्ये प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ४१.३७ तर दिंडोरीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अवघे ४६.०७ टक्के टक्के मतदान झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!