Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

मै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल

Share

42 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण ; नातेवाईक भावूक

नाशिक । दि. 20 प्रतिनिधी

भारतीय सैन्यदलाच्या भरती प्रक्रियेनंतर 42 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत 378 प्रशिक्षणार्थी जवानांची तुकडी आज सेवेत दाखल झाली. या प्रशिक्षणार्थी जवानांनी सैन्याच्या प्राथमिक तसेच प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने 42 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आज त्यांचा दिक्षांत सोहळा आर्टिलरीच्या कवायत मैदानावर पार पडला.

यावेळी आर्टिलरीचे व्यवस्थापकीय संचालक पीके श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, आर्टिलरी सेंटरच्या विशेष लष्करी बॅण्डच्या वैशिष्ट्यपूर्ण धूनच्या तालीवर नवसैनिकांच्या तुकडीचे लष्करी थाटात कवायत मैदानावर आगमन झाले. श्रीवास्तव सलामी मंचावर येताच ग्रुप कमांडरने त्यांना ‘सॅल्यूट’ केले.

लष्करी जवानांच्या या तुकडीने संचलन करत उपस्थितांचे लक्ष वेधले. मै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…अशी शपथ घेतली. आर्टिलरीचे वरिष्ठ अधिकारी व या जवानांच्या आईवडिलांच्या उपस्थित थाटात हा देदिप्यमान सोहळा पार पडला. लष्करी बॅण्डपथकाने वाजवलेली शेर-ए-जवान या धूनने सोहळ्यात रंगत आणली.

आज शपथ घेतलेल्या जवानांना फिजिकल, ड्रिल, वेपन ट्रेनिंगसह असाल्ट व ट्रेडमधील अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर आता हे नवसैनिक सैन्य दलातील वेगवेगळ्या युनिटमध्ये दाखल होणार आहेत. वेगवेगळ्या राज्यातून निवड झालेल्या या प्रशिक्षणार्थीच्या या परेडला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुरुवात झाली.

यादरम्यान हेलिकॉप्टरच्या घिरट्या तसेच मैदानावर भारतीय लष्करात असलेल्या तोफा आणण्यात आल्या होत्या. यावेळी आर्टिलरी सेंटरचा इतिहास तसेच तोफांची माहिती देण्यात आली. शपथ सोहळ्यात विविध धर्मांचे धर्मगुरूही उपस्थित होते.

आजचा दिवस आनंदाचा – पी. के. श्रीवास्तव

मी माझे भाग्य समजतो की, मला आजच्या दिक्षांत सोहळ्यासाठी येण्याची संधी मिळाली. आजचा आनंदाचा दिवस आहे. खडतर प्रशिक्षण करुन जवान आज सेवेत दाखल झाले. इमानदारी आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजवा. शिस्त आणि अनुशासन विसरू नका. भारतीय सैन्याचा इतिहास उज्वल आहे. 1948 नंतर 1965, 1971 आणि 1999 सालच्या युद्धात भारतीय जवानांच्या धाडसाचे उदाहरणे देत त्यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या.

पालक भावूक

नवसैनिकांच्या या शपथ सोहळ्यात त्यांच्या पालकांना खास आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यात आपला मुलगा सैन्य दलात दाखल होणार आहे. यादरम्यान फोटो सेशन सुरु झाल्यानंतर हा सोहळा बघण्यासाठी आलेल्या पालकांना मीठी मारली. यावेळी उपस्थित पालकांनी आनंदाश्रृंना वाट मोकळी करुन दिली.

पुरस्कारप्राप्त नवसैनिक

1. सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी – अविनाश कुमार
2. बेस्ट गनर – अमण राणा
3. बेस्ट ऑपरेटर – राहुल कृष्णा नवले
4. बेस्ट टेक्निकल असिस्टंस – अविनाश कुमार
5. बेस्ट ड्रायव्हर मॅकॅनिकल ट्रान्सपोर्ट – निर्मल हमाल
6. बेस्ट इन फिजीकल टेस्ट
7. बेस्ट इन वेपण ट्रेनिंग – रणधिरकुमार शर्मा
8. बेस्ट इन ड्रिल – गौरव राजेंद्र चव्हाण
9. बेस्ट टीडीएन – मारुती बालप्पा पुजारी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!