Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात एकूण २८ लाख 1८ हजार मतदारांनी केले मतदान; पुरुषांच्या तुलनेत महिला मागे

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील 15 मतदारंसघात सोमवारी (दि.21) मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 45 लाख 44 हजार 641 मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी 28 लाख 17 हजार 997 मतदारांनी मतदानाचा हकक बजावला. त्यातही पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार मतदानाता पिछाडीवर असल्याचे पहायला मिळते. दरम्यान, जिल्ह्यात 62 टक्के मतदानाची नोंंद झाली आहे.

राज्यभर मतदानाचा घसरलेला टक्का हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यातही मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे यासारख्या महानगरात मतदानात घट झाली आहे. सन 2014 विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात 65 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा मात्र, हे प्रमाण घटले असून अवघे 62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार यांद्यांमध्ये घोळ व त्रुटी पहायला मिळाल्या होत्या. ते बघता जिल्हा निवडणूक शाखेेने मतदार याद्या शुध्दीकरण कार्यक्रम हाती घेतला होता. त्यात दुबार, मयत अशी जवळपास 56 हजार नावे वगळण्यात आली. तर, 72 हजार नव मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली.

जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 45 लाख 44 हजार 641 मतदार मतदानासाठी पात्र होते. मात्र, निवडणुकीत त्यापैकी 28 लाख 17 हजार 997 मतदारांनी हक्क बजावला. त्यात 15 लाख 50 हजार 195 पुरुष मतदारांनी मतदान केले.

तर, 12 लाख 67 हजार 798 महिल मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल 17 लाख 26 हजार 644 मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांनी मतदान करावे यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली होती. मात्र, तरी देखील मतदारांमध्ये मतदानाच्या कर्तव्याबाबत निरुत्साह पहायला मिळाला.


4 तृतीयापंथियांनी केले मतदान

जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संंख्या 27 इतकी होती. त्यापैकी अवघ्या चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात नांदगाव, मालेगाव बाह्य, येवला व दिंडोरी येथे प्रत्येकी एका मतदारांचा समावेश आहे.


मतदारसंघनिहाय मतदान

                                     पुरुष         महिला

नांदगाव                      103872            85379
मालेगाव मध्य             108680            91132
मालेगाव बाह्य            110057            92261
बागलाण                     92554              73155
कळवण                      102936            91363
चांदवड                       106846            84750
येवला                        112270            88291
सिन्नर                       109676            88223
निफाड                       109684            93967
दिंडोरी                       113385            95210
नाशिक पूर्व                 99690              80244
नाशिक मध्य              85059              69564
नाशिक पश्चिम          123704            94509
देवळाली                      81472              63281
इगतपुरी                      90410              76549.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!