Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : हतगड शिवारात २७ लाखांचा मद्यसाठा जप्त; विभागीय भरारी पथकाची कारवाई

Share

नाशिक | प्रतिनिधी 

पंजाब राज्यात उत्पादन होणाऱ्या तसेच केंद्रशासित प्रदेशात विक्री होणारा मद्यसाठा ऐन निवडणुकीच्या तोंडावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने शिताफीने ही कारवाई केली. या कारवाईत एकूण २६ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

अधिक माहिती अशी की, विभागीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार कळवण, सुरगाणा येथील विभागीय पथकांनी आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा व उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

हतगड शिवारात संशयित सुनील लक्ष्मण खंबायत (वय २१, रा. हतगड, ता. सुरगाणा)  याच्या ताब्यात पंजाब राज्यात उत्पादन झालेला आणि केवळ अरुणाचल प्रदेश राज्यात विक्रीस अनुमती असलेला १८ ;लाख ३४ हजार किंमतीच्या १८० मिलीलीटर क्षमतेच्या १४ हजार ११२ सीलबंद काचेच्या बाटल्या, तसेच चंडीगडमध्ये विक्रीस असलेल्या बियरच्या ८ लाख ३७ हजार किंमतीचे एकूण ६हजार ६९६ टीन असा एकूण २६ लाख ७१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंद अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित, मद्यसाठा पुरवठादार तसेच विकत घेणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.

ही कारवाई निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक देवदत्त एन पोटे, एसएस रावते, दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, सोन्याबापू माने, रामकृष्ण झंकार, गोकुळ परदेशी, यांच्यासह कळवण विभागाचे निरीक्षक सोनवणे, विकार तसेच बोरगाव सीमा तपासणी नाका येथील दुय्यम निरीक्षक अमोल पाटील, गायकवाड, जाधव यांच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!