२५० सायकलीस्ट्सने पूर्ण केली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा; विशेष फोटो गॅलरी

0
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनतर्फे आणि महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता यु. बी. पवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक-त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉन उत्साहात पार पडली. सुमारे 250 हुन अधिक सायकलीस्ट्सने यात सहभागी होत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली.
रविवारी (दि. 2) रोजी सकाळी सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब येथून सायक्लोथॉनला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, मनपाचे निवृत्त मुख्य अभियंता युबी पवार, लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटचे राजेंद्र वानखेडे, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला गेला.
गेल्या सात वर्षांपासून आयोजित होणाऱ्या ब्रह्मगिरी परिक्रमेचे २० किमीसह ही एकूण ७५ किमीची सायक्लोथॉन सायकलीस्ट्स सर केली. सायकलिंग आणि ट्रेकिंग असा दुहेरी अनुभव देणाऱ्या या सायक्लोथॉन मध्ये एसपी संजय दराडे यांनी पूर्ण सहभाग नोंदवत सर्व सायकलीस्टस सह परिक्रमा पूर्ण केली.
श्रावणात अधिक प्रमाणात होणाऱ्या ब्रह्मपरिक्रमेच्या निमित्ताने या सायक्लोथॉनचे आयोजन होत असते. नाशिक ते त्र्यंबकेश्वर असे सायकलिंग केल्यानंतर २० किमीची पायी परिक्रमा सर्व सायकलिस्ट्सने केली. ब्रह्मगिरीचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची सुवर्णसंधी सायकलीस्ट्सने साधली.

कान्हेरे मैदान – त्र्यंबक रोड – अंजनेरी – पेगलवाडी – पहिने – कोजोळी – गौतम ऋषी टेकडी-दुगारवाडी फाटा – त्र्यंबक – नाशिक असा या परिक्रमेचा मार्ग होता. एकूण ४० महिलांनी या सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदविला. रस्ता संपल्यानंतर गौतम टेकडी येथून सुमारे ४०० मीटरचा चढ सायकल डोक्या खांद्यावर घेत सायकलीस्टस मार्गस्थ झाले. तेथे राजेंद्र निंबाळते आणि त्यांच्या सहकारी स्वयंसेवकांनी सायकल घेऊन जाण्यासाठी मदत केली.

ग्रेप काँटी रिसॉर्ट तर्फे काढण्यात आलेल्या लकी ड्रॉचे विजेते धर्मराज जगधाने यांना एक सायकल भेट देण्यात आली. सायक्लोथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी उपलब्ध करण्यात आले होते.  रुग्णवाहिका, बॅकअप व्हॅन पूर्ण प्रवासादरम्यान उपलब्ध होती. यु. बी. पवार, योगेश शिंदे, अॅड. वैभव शेटे, डॉ. मनीषा रौदळ यांच्या समन्वयाने ही मोहीम राबवली गेली.

LEAVE A REPLY

*