Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोलकाता मध्ये अडकलेले नाशिकचे २०८ भाविक सुखरूप परतले

कोलकाता मध्ये अडकलेले नाशिकचे २०८ भाविक सुखरूप परतले

जुने नाशिक | प्रतिनिधी

अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिन्यांपासून नाशिक परीसरातील दोनशेपेक्षा जास्त भाविक कोलकाता पासून सुमारे 350 किलोमीटर दूर असलेल्या पंडवा शरीफ या गावात अडकून पडले होते. हे सर्व भाविक आज (दि.13) रात्री उशिरा शहरात सुखरूप परतले.

- Advertisement -

महाराष्ट्र शासन तसेच पालकमंत्री छगन भुजबळ खा. हेमंत गोडसे मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे व इतर लोकांच्या पाठपुराव्यामुळे त्यांना येण्याची मार्ग मोकळे झाले होते. पश्चिम बंगाल सरकारने 9 मे रोजी या सर्व भाविकांची आरोग्य तपासणी करून चार विशेष बसेस मध्ये यांना नाशिकसाठी रवाना केले होते.

पश्चिम बंगाल सीमेपर्यंत हे सर्व भाविक पोलिस बंदोबस्तात आले होते, यानंतर मात्र त्यांचा बंदोबस्त काढण्यात आला होता. यामुळे रस्त्यात त्यांना अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला, मात्र सर्व अडचणींवर मात करून हे भाविक एक रात्री शहरात आपल्या गावात परतले. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वेगळे आनंद दिसत होते. काही भाविकांना मायभूमी गाठताच रडू कोसळले होते. या भाविकांमध्ये सुमारे पंचवीस लहान मुले असून ज्येष्ठ नागरिक, महिला यांची संख्या अधिक होती. दोन महिन्यांपासून घरापासून दूर होते.

केंद्र सरकारने इतर राज्यातून प्रवाशांना आणण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर परत येण्याची भाविकांची आशा वाढली होती. यानंतर अनेकांनी विशेष पाठपुरावा करून त्यांना आणण्यास हातभार लावला. हे सर्व भाविक पंडवा शरीफ (पश्चिम बंगाल) याठिकाणी उर्स साठी मार्च महिन्यात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार 16 मार्च ते 23 मार्च रोजी त्यांचे प्रतीचे रेल्वे तिकीट कन्फर्म होते मात्र लॉक डाऊन मुळे रेल्वे बंद करण्यात आले.

यानंतर 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आल्याने त्यांना त्याच ठिकाणी रहावे लागले यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून या सर्वांचे तिकीट 16 एप्रिल चे करण्यात आले मात्र यानंतरही लॉक डाऊन वाढविण्यात आल्याने त्यांचा मुक्काम देखील वाढला होता. अशावेळी त्यांनी हे कठीण काळ त्याच ठिकाणी राहून काढला.

सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय धमाळ, महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित आहे. राहत फाउंडेशनच्या वतीने या सर्व भाविकांची रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे यासाठी आसिफ शेख, ad. नाजीम काजी, जहीर शेख आदी परिश्रम घेत आहे.

आज रात्री या सर्व भाविकांचे मुक्काम याठिकाणी राहणार असून उद्यापासून यांची आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, शहरासह ग्रामीण भागातील देखील भाविक असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या