Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र २८ वर; १७ हजार पेक्षा अधिक नागरिक स्थानबद्ध

नाशिक शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र २८ वर; १७ हजार पेक्षा अधिक नागरिक स्थानबद्ध

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील करोना विषाणू बाधीत रुग्णांचा आकडा 39 पर्यत गेला असुन करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी महापालिका आयुक्तांनी 6 एप्रिल ते 9 मे पर्यत 28 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे. यामुळे शहरात पाच हजाराच्यावर घरे र्पतिबंधीत क्षेत्रात आले असुन यात 17 हजाराच्यावर नागरिक घरात अडकुन पडले आहे. शहरात गेल्या नऊ दिवसात वाढलेली आकडेवारी नाशिककरांची चिंता वाढविणारी आहे.

- Advertisement -

महापालिका प्रशासनाकडुन शहरात करोना प्रादुर्भाव रोकण्यास जोरदार प्रयत्न सुरू असतांना अगोदरच्या करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि मालेगाांव येथे पोलीस बंदोबस्तात गेलेल्या कर्मचार्‍यांना करोना संसर्ग झाल्याने नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा आकडा वाढत आहे.

गेल्या 8 मे रोजी शहरतील 13 जणांना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानतंर 9 मे रोजी पुन्हा 6 करोना बाधीतांची यात भर पडली आहे. यामुळ करोना बाधीतांचा आकडा 39 पर्यत गेला आहे. शहरात 8 मे पर्यत 20 प्रतिबंधीत क्षेत्र आयुक्तांनी जाहीर केले होते.

यानंतर शनिवारी (दि.9) पुन्हा यात 8 ने भर पडली असुन आता एकुण 28 प्रतिबंधीत क्षेत्र झाले आहे. या 28 प्रतिंबंधीत क्षेत्रास पाच हजाराच्यावर घर येत असुन याठिकाणी राहत असलेले 17 हजाराच्या वरील नागरिक घरात अडकुन पडले आहे. या सर्व कुटुंबाचा आरोग्य सर्व्हे महापालिका वैद्यकिय विभागाकडुुन सुरु असुन यातील पाच प्रतिबंधीत क्षेत्राचा आरोग्य तपासणी पुर्ण झाली आहे.

शनिवारी शहरातील आयोध्यानगरी, हिरावाडी पंचवटी, सागर व्हिलेज धात्रक फाटा आडगांव शिवार पंचवटी, हरिदर्शन अपार्टमेंट धात्रक फाटा पंचवटी नाशिक, तक्षशिला रो हाऊस कोणार्कनगर आडगांव शिवार पंचवटी नाशिक, इंदिरानगर नाशिक पुर्व विभाग व तारवालानगर पंचवटी अशा ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केले आहे.

यानंतर शनिवारी रात्री पुन्हा चार करोना बाधीत रुग्ण आढळून आले असुन यातील पाटीलनगर (नवीन नाशिक) येथील एका महिलेला तिच्या करोना बाधीत आईच्या संपर्कामुळे संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा परिसर अगोदरच प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. तसेच मालेगांवला पोलीस बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या कर्मचारी हा पॉझिटीव्ह आढळून आला असुन अगोदरच हा परिसर प्रतबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आले आहे.

तसेच जैन मंदिर आडगांव या भागातील पोलीस कर्मचारी करोना बाधीत असल्याचे समोर आले असुन तो देखील मालेगांव येथे बंदोबस्तांसाठी होता. आता आडगांव येथील जैन मंदिर परिसर आणि सिन्नर फाटा येथील फळ विक्रेता राहत असलेला भाग प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या