Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लॉकडाऊनकाळात नाशिककरांना लागते दररोज १५ दशलक्ष लिटर जादा पाणी

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागु असलेल्या लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या नाशिककरांकडुन स्वच्छतेवर भर दिला जात असल्याने पुर्वी पेक्षा जास्त 15 एमएलडी जादा पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी आता महापालिका क्षेत्रात महापालिका पाणी पुरवठा विभागाकडुन सध्या दररोज 515 एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. या जादा पाणी पुरवठ्याची झळ नाशिककरांना पुढच्या काळात बसण्याची शक्यता आहे.

23 मार्च पासुन सुरू झालेला लॉकडाऊन आता तिसर्‍या टप्प्यातील अंतीम चरणात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडुन केवळ अत्यावश्यक सेवा – दुकाने ठराविक वेळेत उघडी ठेवण्यात परवानगी देण्यात आली होती.

या काळात हॉटेल, खाजगी दवाखाने – रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, न्यायालये सरकारी, निमसरकारी व शासन उपक्रम, महामंडळांची कार्यालये बंद होती. याठिकाणी मोठड्या प्रमाणात सुरू असलेला पाण्याचा व्यावसायिक बंद झाला होता. यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शहरातील नियमित पाणी पुरवठ्यात घट होणे अपेक्षित असतांनाच, पाण्याचा वापर वाढल्याचे समोर आले होते. लॉकडाऊनपुर्वी दररोज शहरात पुर्वी प्रमाणेच 450 ते 500 एमएलडी (17.5 एमसीएफटी) पाणी पुरवठा केला जात होता.

मात्र लॉकडाऊनमध्ये करोनाच्या दहशतीने हातपाय धुवण्यासाठी दिवसभरातून अनेकवेळा पाण्याचा वापर करणे आणि बाहेरुन घरी परतल्यावर दुसर्‍यांना आंघोळ करणे यामुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशाप्रकारे पाण्याचा वापर वाढत असतांना आता राज्य शासनाकडुन अत्यावश्यक सेवा आणि विना अत्यावश्यक सेवा – दुकाने, सरकारी कार्यालयांना परवागी देण्यात आली आली आहे. यामुळे आता शहरात 500 एमएलडी होणार्‍या पाणी पुरवठ्यात 15 एमएलडी इतकी वाढ झाली आहे.

गेल्या फेब्रुवारी 2020 मध्ये शहराला 450 एमएलडी पाणी पुरवठा केला जात होता. नंतर लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात केवळ अत्यावश्यक सेवा – दुकाने सुरू असल्याने इतर बंद दुकाने, कार्यालये बंद असल्याने शहरातील नियमित व्यावसायिक पाणी पुरवठा हा सरासरी सुमारे 5 ते 6 टक्क्यांनी कमी झाला होता. नंतर मात्र लॉकडाऊन जसजसा वाढत गेला, तसा पाण्याचा वापर वाढत गेला आहे.

आता शेवटच्या टप्प्यात सरकारी कार्यालये, बाजारपेठा सुरू झाल्यामुळे आता दररोज 515 एमएलडी पाणी पुरंंवठा केला जात आहे. दरम्यान शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्येय होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. यात नागरिकांकडुन आता वाहने, सफाई, पाण्याचा सडा मारणे, झाडांना मोठ्या प्रमाणात पाणी टाकणे, मोठ्या प्रमाणात कपडे धुणे, दोन तीन वेळा आंघोळ करणे आदी प्रकार सुरू झाले आहे.


त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावीत…

शहरातील जनजीवन पुर्वपदावर येत असुन आता शहरातील पाणी पुरवठा 515 एमएलडीपर्यत गेला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडुन स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असले तरी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. यात दरवाजासमोर पाण्याचा सडा मारणे, घराचा परिसर पाण्याने दररोज धुणे, घरासमोरील झाडांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी टाकणे या माद्यमातून पाण्याचा अपव्येय सुरू आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुर्वी प्रमाणे दंडाची कारवाई सुरू करावी अशी मागणी जाणकार नागरिकांकडुन केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!