Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात विधासभेच्या १५ जागांसाठी १४८ उमेदवार रिंगणात; ७६ पक्षाचे तर ७२ अपक्ष आजमावणार नशीब

Share
election-postponed-vilad-and-pimpri-ghumat-grampanchayat

नाशिक  | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागांसाठी विविध पक्षाचे १४८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदा तब्बल ७२ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतांचे विभाजन होणार असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

नाशिक मध्यमध्ये चौरंगी लढत बघायला मिळणार असून मनसेचे नितीन भोसले, कॉंग्रेसचे हेमलता पाटिल, भाजपच्या देवयानी फरांदे तर वंचित बहुजन आघाडीतर्फे संजय साबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पुर्वमध्ये दुरंगी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप, भाजपचे राहुल ढिकले तर कॉंग्रेसचे गणेश उन्हवणे यांच्यात लढत होणार आहे. पश्चिममध्ये पंचरंगी लढत  बघायला मिळणार असून भाजपच्या सीमा हिरे, राष्ट्रवादीचे डाॅ.अपुर्व हिरे, माकपचे डाॅ. डी.एल कराड, अपक्ष विलास शिंदे तर मनसेचे – दिलीप दातीर यांच्या लढत होणार आहे.

देवळाली कॅम्पमध्ये शिवसेनेचे योगेश घोलप, भाजपच्या सरोज आहेर यांच्याच्या सरळ लढत होणार असली तरी याठिकाणी सह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये ८ वेगवेगळ्या पक्षाची तर ४ उमेदवार अपक्ष आहेत.

नांदगावमध्ये दाखल झालेल्या २८ नामनिर्देशन अर्जापैकी १३ उमेदवारांनी माघार घेतली तर १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात चार पक्षाचे तर ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

मालेगाव मध्यमध्ये दाखल झालेल्या १४  नामनिर्देशन अर्जापैकी ०१ उमेदवाराने माघार घेतली तर १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात तीन पक्षाचे तर १० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

मालेगाव बाह्यमध्ये दाखल झालेल्या ११  नामनिर्देशन अर्जापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली तर ०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात तीन पक्षाचे तर ०६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

बागलाणमध्ये दाखल झालेल्या १५  नामनिर्देशन अर्जापैकी ०९ उमेदवारांनी माघार घेतली तर ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात तीन पक्षाचे तर तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

कळवण मध्ये दाखल झालेल्या ८  नामनिर्देशन अर्जापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली तर ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात पाच पक्षाचे तर एक अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.

चांदवड मध्ये दाखल झालेल्या १४  नामनिर्देशन अर्जापैकी ०५ उमेदवारांनी माघार घेतली तर ०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात पाच पक्षाचे तर ०४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

येवला मध्ये दाखल झालेल्या १४  नामनिर्देशन अर्जापैकी ०६ उमेदवारांनी माघार घेतली तर ०८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात पाच पक्षाचे तर ०३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

सिन्नर मध्ये दाखल झालेल्या १०  नामनिर्देशन अर्जापैकी ०१ उमेदवारांनी माघार घेतली तर ०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात सहा पक्षाचे तर ०३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

निफाड मध्ये दाखल झालेल्या ०९  नामनिर्देशन अर्जापैकी ०३ उमेदवारांनी माघार घेतली तर ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात पाच पक्षाचे तर ०१ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

दिंडोरी मध्ये दाखल झालेल्या ०८  नामनिर्देशन अर्जापैकी ०३ उमेदवारांनी माघार घेतली तर ०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात पाच पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

इगतपुरी मध्ये दाखल झालेल्या १२  नामनिर्देशन अर्जापैकी ०३ उमेदवारांनी माघार घेतली तर ०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात पाच पक्षाचे तर ०४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!