Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक८० वर्षांचे रेकाॅर्ड ब्रेक ; १४४ मिमी पाऊस बरसला

८० वर्षांचे रेकाॅर्ड ब्रेक ; १४४ मिमी पाऊस बरसला

नाशिक । प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाने नाशिकला जोरदार तडाखा दिला असून एकाच दिवशी तब्बल १४४.२ मिली मीटर इतका पाऊस कोसळला. यापुर्वी २५ जून १९४० ल‍ा एकाच दिवशी ११०.५ मिली मीटर इतका पाऊस पडला होता. मात्र, निसर्ग वादळाने तब्बल ८० वर्षांपुर्वीचे रेकाॅर्ड तोडले असून एकाच दिवशी १४४ मिमी पाऊस पडण्याचे नवीन रेकाॅर्ड नोंदवले गेले आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपुर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे कोकण किनार पट्टिवर निसर्ग वादळ धडकले. त्यामुळे मागील दोन दिवस नाशिकमध्येही वादळीवारा व पाऊस पहायला मिळाला. पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शहरासह जिल्ह्यात दाणाफाण उडाली होती.

शेत पिके, पोल्ट्री फर्म, पाॅली हाऊस, कांदा चाळी यांचे मोठे नूकसान झाले. निसर्ग चक्रीवादळ नाशिकला स्पर्शून पुढे धुळेकडे गेले. त्यामुळे एका दिवसात तब्बल १४४.२ मिली मीटर इतका पाऊस नोंदवला गेला. मागील काही वर्षांचे रेकाॅर्ड तपासले तर जून महिन्यात एकाच दिवशी पडलेला हा सर्वाधिक पाऊस असल्याचे समजते. यापुर्वी २५ जून १९४० ला ११०.५ मिली मीटर इतका पाऊस पडला होता.

तापमानाचा पारा १२ अंशांनी लुडकला

एकिकडे एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस पडल्याचे जुने रेकाॅर्ड मोडल्या गेल्यानंतर तापमानाचा पारापण लुडकल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी २४.६ डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. पावसामुळे तापमानाच्या पार्‍यात १२ डिग्री सेल्सिअसने घट झाली. मागिल १४ वर्षातील जून महिन्यातील हे सर्वात कमी तापमान ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या