गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३६ हजारांच्या अंमली पदार्थासह एकास अटक

0

नाशिक | प्रतिनिधी 

गुन्हे शोध पथकाच्या युनिट क्रमांक १ ने केलेल्या कारवाईत १२० ग्रम चरस नामक अंमली पदार्थासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज पहाटेच्या सुमारास भद्रकाली परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भद्रकाली परिसरातील यासीन उर्फ सोन्या युनुस शेख (रा. शर्मा पाटकरी लॉज समोरे, खडकाळी) हा मुंबई परिसरातून आणलेला चरस नावाचा अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे समजले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कुलकर्णी यांच्या पथकाने खडकाळी  सिग्नलजवळ पहाटे चारच्या सुमारास सापळा रचला. त्याच्याकडून १२० ग्रम वजनाचा चरस नावाचा अंमली पदार्थ, मोबाईल फोनसह एकूण ३९ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत  केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर,

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट करवाळ, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, अनिल दिघोळे, पोलीस नाईक असिफ तांबोळी, दिलीप गोन्ढे, संतोष कोरडे, मोहन देशमुख, शांताराम महाले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भोईर,  विशाल साठे, विशाल देवरे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, रावजी मगर व प्रतिभा पोखरकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*