Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी

Share

नाशिक । प्रतिनिधी

बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणार्‍या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेत शासनाने असंघटीत बांधकाम कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून 11 कोटी 39 लाख रुपयांचे वाटप केले असून, या नोंदणीसाठी बोगस लोकांचा शिरकाव होऊ लागल्याने कामगार विभागाने आता प्रत्यक्ष बांधकाम स्थळावर जाऊन नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. दि.15 जून ते दि.14 ऑगस्ट दरम्यान नाशिक विभागातून 15 ते 20 हजार कामगारांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

असंघटीत बांधकाम कामगारांसाठी शासनाद्वारे विविध 28 प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी या कामगारांना नोंदणी करणे बंधनकारक आहे.यातून मुलींच्या जन्मापासून,बाळंतपण, विवाह, शिक्षण, आरोग्य, गंभीर आजार अपंगत्व, मृत्यू यासारख्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर शासनाद्वारे आर्थिक मदतीची तरतूद ठेवण्यात आलेली आहे.

मागिल आर्थिक वर्षात नाशिक विभागात नोंदणी झालेल्या 25हजार 462 कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून 11 कोटी 39 लाख 56 हजार 900 रुपयांचे वाटप करण्यात आले.

नाशिक विभागात येणार्‍या नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर या भागातून ही नोंदणी करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात या विभागात कार्यरत असलेल्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. त्यापटीत नोंदीत झालेल्या कामगारांची संख्या अत्यल्प असल्याचा निर्वाळा कामगार संघटना देत आहेत.याबाबत प्रशासनाद्वारे मात्र बांधकाम व्यवसायिकांसह कामगारांचीं उदासिनता कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

दिलेले लाभ
प्रत्यक्षात नोंदणी झालेल्या कामगारांसाठी शासनाच्या विविध 28 योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. मागिल आथिक वर्षात नाशिक विभागातील महिलांना प्रसुतीसाठी 15 लाख 95 हजार रुपये वाटप करण्यात आले. अपंगत्व आलेल्या कामगारांना 1 लाख रुपये देण्यात आले. विधवा पत्नी किंवा पती यांना 24 हजार रुपयांप्रमाणे 3 लाख 72 हजार रुपये वाटप करण्यात आले. कामगारांच्या 5 प्रकारच्या दैनंदिन वस्तू खरेदीसाठी प्रत्येकी 3 हजार रुपये प्रमाणे 8881 कामगारांना 2 कोटी 66 लाख 43 हजार रुपये वाटप करण्यात आले.तर 15849 नोंदीत कामगारांना अवजार खरेदीसांठी 7 कोटी 92 लाख रुपये खर्च करण्यात आले.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड, मालकांचे पत्र, फोटो

कामगार उदासिन

बहुतांश कामगार हे बाहेर गावाहून आलेले आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी अथवा विविध सणांच्या निमित्ताने बहुतेक वेळा ते शहरात थांबत नाही. त्यांच्या येण्याच्या बाबत अस्थिरता असते. योजनांबाबत त्यांच्यात दुर्लक्षितपणा जास्त राहतो. कागदपत्रांचा अभाव व बांधकाम व्यावसायिक उगाच झंझंट नको म्हणून करीत असलेली टाळाटाळ यामुळे कामगारांची संख्या मोठी असतानाही नोंदणी कमी होत आहे.मनुष्यबळाअभावी फार सक्षमपणे योजना राबविणे अडचणीचे होत आहे. उपलब्ध मनुष्य बळात मोहिमेचे काम गतिमान करण्याचा प्रयत्न आहे.

किशोर दहिफळकर (सहाय्यक आयुक्त कामगार विभाग)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!