Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘काय करणार लॉटरीच्या पैशाचं, वाहतूक दंड भरणार’; नवे वाहतूक नियम सोशल मीडियावर ट्रोल

Share

नाशिक : देशभरात वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान यामुळे सोशल मिडीयावर नव्या नियमांना ट्रोल केले जात आहे. यामध्ये दंड असे आकारले जात आहेत कि जसे युरोपसारखे रस्ते दिले आहेत, अशी टीका या या हायरल मॅसेज मधून केंद्र सरकारवर करण्यात येत आहे.

दरम्यान गेल्या ०१ सप्टटेंबरपासून वाहतुकीबाबत नवे नियम लागू झाले आहेत. यामध्ये हेल्मेट न घालणे, लायसन्स न बाळगणे, सिग्नल  तोडणे यासारख्या विविध नियमांचा समावेश आहे. तसेच शहरातही वाहतुक शाखेकडून या नियमांचे अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु या नियमांवरचे विनोद सोशल मिडीयावर मात्र जोरदार फिरत आहेत. ‘इथं बारा तास काम करून महिना दहा हजार मिळतो अन तुम्हाला दंड २० हजार’, असे प्रश्न या माध्यमातून विचारण्यात येऊ लागले आहेत.

नाशिक शहरात पोलीस आयुक्त नांगरे यांच्या हस्ते नियम फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. परंतु अद्याप नियम लागू झाले किंवा नाही याबाबत सांशकता आहे. पण सोशल मीडियावर या नियमावरील विनोदांना पेव फुटले आहे. यामध्ये

तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, २०,००० घेऊन या.. पोरगं घेऊन जा ! “

थांबा… मी पोलिसांनाच तक्रार करते..

“आम्ही पोलीसच आहोत… गाडी चालवताना नियम मोडलेत त्याने..”

‘वाहतूक पोलिसांबरोबर आता डॉक्टरही राहणार… दंड भरला नाही तर किडनी काढता येईल.’,

वाहतूक नियम वाचल्यावर थेट घोडाच घेतला साहेब’, दंड तर असा आकारात आहेत यामध्ये दुसरी गाडी येऊन जाईल,

अशा प्रकारच्या विनोदांनी सोशल मीडियावर नव्या नियमांना ट्रॉल केले जात आहे.

परंतु या नियमांबाबत लवकरच विचार विनिमय करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जरी नवे नियम लागू केले असले तरी काही राज्यांमध्ये अद्याप अमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच महाराष्ट्रातही या नियमांबाबत बदल करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!