‘गो गॅस’ विणणार व्यवसायाचे जाळे

‘गो गॅस’ विणणार व्यवसायाचे जाळे

नाशिक : कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड कंपनी सुरुवातीपासूनच गो गॅसच्या माध्यमातून राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी अग्रणी राहिली असून, हरित क्रांतीच्या दिशेने मोठे योगदान देत आहे. ही एक खासगी एलपीजी बॉटलर आणि विपणन कंपनी आहे.

गो गॅस आणि गो गॅस एलिट या नावाने कंपनी एलपीजी पॅक्ड सिलेंडरमध्ये विक्री करीत आहे. त्यास ग्राहकांचाही प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात कंपनीचे जाळे विस्तारण्याचा आमचा मानस असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक शैलेंद्र वैद्य आणि बिझनेस डेव्हलपर्स हेड सुमीत भद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘गो गॅस एलिट कॉम्पोझिट गॅस सिलिंडर हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगून भद्रा म्हणाले, येत्या काळात भारतीय स्वयंपाकघरात परिवर्तन घडवेल. 2018-19 मध्ये एलपीजीच्या मागणीत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. एलपीजीच्या वापरातील वाढीस विविध सरकारी योजनांनी पाठिंबा प्राप्त झाला आहे. पहिले म्हणजे एलिट कॉम्पोझिट गॅस सिलिंडर्स अतिशय हलक्या वजनाचे असतात.

त्यामुळे महिला व मुलांना सहजरित्या हलवता येतात. एलिट सिलिंडर्सचे संचय पारदर्शक असते, ज्यामुळे सिलिंडर्समध्ये गॅसचे प्रमाण नेहमीच दिसून येते. यामुळे गॅस चोरीची शक्यता राहत नाही. एलिट सिलिंडर पूर्णपणे ‘ब्लास्ट प्रूफ’ आहेत. त्यामुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान होत नाही असेही त्यांनी नमूद केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com