कर्जधारकांकडे जिल्हा बँकेचे 26 कोटी

0

नाशिक। प्रतिनिधी
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपल्याच आजी,माजी सेवकांसह मालेगाव, नांदगाव तालुक्यातील कर्जधारकांनी अडचणीत टाकले आहे. या दोन्ही घटकांकडे जिल्हा बँकेचे सुमारे 26 कोटी रुपये अडकले असून,त्यांच्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी बँकेनी आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेने सन 2016-17 या वर्षात जिल्ह्यातील दोन लाख 60 हजार शेतकर्‍यांना दोन हजार 750 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले.दरम्यान कर्जमाफीची चर्चा सुरु झाल्यामुळे शेतकर्‍यांनी संपूर्ण कर्जमाफी होईल,म्हणून कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली.सलग दोन वर्ष कर्ज थकितमुळे त्याचे ‘एनपीए’त रूपांतर झाले आहे.परिणामी जिल्हा बँक अधिक अडचणित आली असून, नवनवीन आर्थिक संकटे निर्माण झाली आहेत. या परिस्थितीत बँकेचे कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना थेट कर्ज वितरित करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला. त्यासाठी 2012-13 मध्ये राज्य सरकारने आखलेल्या धोरणांचा सहारा घेत नांदगाव तालुक्यातील 362 व मालेगावच्या 185 शेतकर्‍यांना 11 कोटींचे थेट कर्जवाटप केले. महत्त्वाचे म्हणजे यापैकी एकाही व्यक्तीने हे कर्ज भरण्याची इच्छा दर्शवली नाही. त्यामुळे दोन वर्षातील व्याजासह ही रक्कम आता 18 कोटींवर पोहोचली आहे.

बँकेच्या आजी, माजी 146 सेवकांकडे 3 कोटी 76 लाख रुपये कर्ज थकीत असून, व्याजासह ही रक्कम 8 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे थेट कर्जदार यांच्याकडे 18 कोटी व आजी, माजी सेवकांकडील 8 कोटी असे एकूण 26 कोटी रुपये अवघ्या 928 व्यक्तींकडे अडकले आहेत. एकिकडे बँक आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी कसून प्रयत्न करत असताना, बँकेचे सेवकच सहकार्य करत नसल्यामुळे प्रशासनाने त्यांना‘लक्ष’केले आहे. विद्यमान 36 सेवकांंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून,त्यांनी वेळीच कर्ज न भरल्यास तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. या 36 सेवकांकडे सव्वाकोटी रुपये अडकले आहेत, तर उर्वरित रक्कम माजी सेवकांंच्या नावे असल्यामुळे त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय बँकेनी घेतला आहे. या धडक कारवाईमुळे सेवका़ंचे धाबे दणाणले आहे.

मालमत्तांवर बोजा
कर्जाचा बोजा वाढलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांना कर्जवाटप बंद करून थेट लाभार्थ्यांना बँकेने कर्ज सन 2012-13 मध्ये राज्य सरकारने निर्धारित केलेल्या धोरणाचा आधार घेत, दोन तालुक्यांमधील 762 शेतकर्‍यांना 18 कोटींचे थेट कर्ज दिले. यापैकी एकाही शेतकर्‍याने अद्याप परतफेड केलेली नाही.त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मालमत्तांवर बँकेने बोजा चढविण्याची कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

*