युवकांसह महिलांवर बेरोजगाराची कुर्‍हाड : चित्रा वाघ

0

नाशिक। प्रतिनिधी
युती सरकारच्या काळात केवळ देशातील युवकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली नाही तर शहरी आणि मुख्यत्वेकरून ग्रामीण भागातील महिलांवर अधिक बेरोजारीची कुर्‍हाड कोसळली असल्याा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा दौर्‍यावर असतांना त्यांनी आज राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे महिला पदाधिकार्‍यांसोबत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षापूर्वी सत्तेवर येण्याअगोदर दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देणार असे आश्वासन दिले होते. मात्र नुकत्याच आलेल्या अहवाला नुसार रोजगार नाहीतर तब्बल 1 कोटींहून अधिक लोकांचा रोजगार गेला असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये तरुणांबरोबर महिलांचा आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिलांवर रोजगाराची कुर्‍हाड कोसळली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केवळ रोजगारच नाही तर महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न देखील गंभीर आहे. राज्यातील अनेक महिला बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहे. याची कबुली खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिली आहे. त्याचबरोबर उज्वला योजना, आरोग्य, कुपोषण, बालमृत्यू, डॉक्टर अब्दुल कलाम आहार योजना, महागाई या सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यात सफशेल अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देशातील महिला सरकारला घालविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*