भुजबळांसाठी असलेली ‘ही’ अट कोर्टाकडून शिथील

0

नाशिक । राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळांना आता कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशात कुठेही जाता येणार आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडापुढे सुनावणी करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. त्यावेळी त्यांना अट घालण्यात आली होती कि जेव्हा मुंबईबाहेर जायचे असेल तर आपणास कोर्टाची परवानगीशिवाय जाता येणार नाही परंतु आता न्यायालयानेच सांगितल्यामुळे भुजबळांना दिलासा मिळाला आहे.

यासाठी त्यांनी आत शिथिल करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असलेल्या भुजबळ यांच्या गैरहजेरीत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सैरभैर झाली.

तर भुजबळ समर्थकही पक्षापासून दुरावले गेले, मात्र जामीन मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरा करत पुन्हा भुजबळांनी सक्रिय होण्याचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

LEAVE A REPLY

*