पेट्रोल दरवाढीनिषेधार्थ राष्ट्रवादीचे गांधीगिरी आंदोलन

0

नाशिक : वाढत्या पेट्रोल दरवाढीविरुद्ध नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शहरातील त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी “गुलाब पुष्प” देऊन गांधीगिरी आंदोलन केले.

पेट्रोल, डिझेल दर कमी करण्यासाठी भाजप – शिवसेना युती सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलतांना केली.
पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने अजून महागाईचा भडका उडण्याची भीती देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र भाजप – शिवसेना युती सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर दरवाढीबद्दल आंदोलन करण्यात आले.
यावेळी एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ.भारती पवार, बाळासाहेब कर्डक, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, कविता कर्डक, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्षा अनिता भामरे, विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, सुरेश आव्हाड, सोमनाथ बोराडे, संजय खैरणार, बाळासाहेब म्हस्के, मकरंद सोमवंशी, सुनिल कोथमिरे, लक्ष्मण मंडाले, शंकर मोकळ, दत्ता कुवर, सुनिल अहिरे, महेश भामरे, भालचंद्र भुजबळ, नंदकुमार कदम, नाना साबळे, डॉ. संदीप चव्हाण, अल्ताफ पठाण, प्रल्हाद जाधव, संतोष शेजवळ, दिपक पाटील, गणेश गायधनी, कुणाल बोरसे, योगेश दिवे, अमोल नाईक, आकाश कोकाटे, सागर ठाकरे, राजाभाऊ जाधव, योगेश निसाळ, विलास कांडेकर, पूनम शहा, रंजना गांगुर्डे, सुरेखा पठाडे, रंजना चव्हाण, शकीला शेख, आशा भंदुरे, शाहीन शेख, सलमा शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*