Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

राष्ट्रवादीचे १३ आमदार अद्याप नॉट रीचेबल; आमदार पवार, झिरवाळ दिल्लीत

Share

नाशिक : राज्यातील सत्तानाट्याला मिनिटाला धक्कादायक घडामोडीं घडत असताना अद्यापही राष्ट्रवादीचे १३ आमदार नॉट रिचेबल असून आमदार नितीन पवार आणि नरहरी झिरवाळ दिल्लीत असल्याची माहिती आहे.

दरम्यान सकाळपासून आमदारांना हलविण्याचे काम सुरु असून शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराची भेट घेतली आहे. मात्र अशातच राष्ट्रवादीचे १३ आमदार संपर्कात नसल्याने राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे. तर कालपासून बेपत्ता असलेले नितीन पवार दिल्लीत असल्याची माहिती मिळते आहे.

तर निफाड आमदार दिलीप बनकर यांना घेऊन जयंत जाधव, कैलास मुदलीयार मुंबईकडे रवाना झाले आहेत. सायंकाळी राष्ट्रवादीची महत्वाची बठक असल्याने सर्व आमदारांना हलविण्यात येत आहे. तसेच शिवसेना , काँग्रेसच्या आमदारांनाही जयपूर तथा दिल्लीत हलविण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!