Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

तरूणाईला यंदाही दांडियाची भुरळ; गरबा शिकण्यासाठी कल वाढला

Share

नाशिक । नवरात्रोत्सवानिमित्त यंदा रास दांडिया, रास गरबा आदी नृत्यांची धामधूम राहणार आहे. या उत्सवामुळे महिला वर्गात आणि विशेषत: तरूणाईत नवचैतन्य निर्माण होते.

शहरात यंदा विविध सार्वजनिक मंडळांनी दांडिया, गरबासाठी तयारी सुरू केली आहे. बहुतेक ठिकाणी सार्वजनिक मंडळासह महिलांनी नवरात्रोत्सव मंडळे स्थापन करून विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. सध्या शहरात दांडीया शिकण्यासाठी डान्स क्लासेसमध्ये गर्दी दिसत आहे. पारंपारिक नृत्याबरोबरच बॉलिवूड आणि सालसा डान्स सध्या लोकप्रिय आहे. या डान्सचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे, अशी युवावर्गाची इच्छा असते.

त्याकरता विद्यार्थी डान्स क्लासमध्ये सहभाग नोंदवितात. यंदाही पारंपरिक नृत्या बरोबरच बॉलिवुड डान्सने तरूणाईला भूरळ घातली आहे. विविध डान्स क्लासेसमध्ये गरबा आणि दांडियाची धूम सुरू झाली आहे. पारंपरिक नृत्यांमध्ये दोडीेओ, सनेडो, दो मारी, चारमारी लहेर, 6 स्टेप अशा नृत्यांचा समावेश आहे. या नृत्यांबरोबरच बॉलिवुड दांडियाचा यंदा जोर आहे. त्यामुळे हा प्रकार शिकण्यासाटी तरुण-तरुणी जास्त उत्सूक आहेत.

यातील नवीन प्रकार म्हणजे बॉलिवुडच्या आणि वेस्टर्न डान्सच्या काही स्टेप एकत्र करून फ्युजन तयार केले आहे. तसेच अनेक वर्षांपासून लोकप्रिय डिस्को दांडिया हा प्रकार आजही तितकाच उत्साहाने खेळला जातो. बॉलिवुडमध्ये जोगाडा तारा, कमरीया, रामलिला व अन्य या गाण्याची सध्या चांगलीच चलती आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदा गरबा आणि दांडिया शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून अ‍ॅडमिशन फुल्ल होत आहे. बॉलिवुड गरबा शिकण्याकडे तरुण-तरुणींचा चांगला कल असल्याचे नृत्य प्रशिक्षक सांगत असून पारंपारिक गाण्यात मॉर्डनायझेशन करून यावर नृत्याचे धडे दिले जाते.

तरूणाईसह महिलांमध्ये गरबा दांडीयाची क्रेझ आहे. नविन काही बदल झालेले नाहीत. सध्या 200 प्रवेशितांना दांडीया आणि गरब्याच्या नृत्याचे धडे दिले जात आहेत.
-प्रतिक हिंगमिरे, नृत्य प्रशिक्षक (प्रतिक गरबा अ‍ॅण्ड रास, नाशिक)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!