Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कालिका यात्रेत महिला चोरट्यांची ‘हातसफाई’

Share

नाशिक । कालिका देवी यात्रेत महिलांच्या गळ्यातील पोत तसेच मोबाईल लंपास करणार्‍या दोन महिलांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यत घेतले.

रोशनी संतोष चव्हाण (20, रा. सिल्लोड, औरंगाबाद), चिंगू अशोक भोसले (22, रा. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत.

मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मंगळसूत्र चोरी करणार्‍या एका महिलेला भाविक महिलेने ओळखून पोलिसांच्या हवाली केले. तसेच दुसर्‍या घटनेत सकाळी एक महिला चोर भाविकाच्या हातातील मोबाईल हिसकावून गर्दीतून पळ काढताना सुरक्षारक्षकांच्या नजरेस आली. तत्काळ महिला पोलिसांनी पाठलाग करून तिला ताब्यात घेतले.

संशयित रोशनी चव्हाण व चिंगू भोसले अशी त्यांची नावे असून या दोघींची अंगझडती घेतली असता महिला पोलिसांना 5 ग्रॅम वजनाची 15 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, 18 हजार रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

कालिका देवी यात्रोत्सवानिमित्त मुंबई नाका परिसरातील मंदिराभोवती पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलीसदेखील या ठिकाणी तैनात आहेत. तसेच 24 तास पोलिसांकडून मदत केंद्र उभारून सातत्याने भाविकांना सावधानतेच्या सूचना ध्वनिक्षेपकावरून पोलीस देत आहेत. त्यामुळे भाविक गर्दीमध्येदेखील सावध राहत आहेत. त्यामुळे या महिलांना पकडण्यात यश आल्याचे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!