Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नवरात्री २०१९ : सप्तशृंगीनिवासिनीचे प्रतिरूप असणारी ‘सांडव्यावरची देवी’

Share

नाशिक : नाशिक हे मंदिराचं शहर म्हटलं जाते . येथे काळाराम मंदिर,त्रंबकेश्वर ,कपालेश्वर, गोरेराम मंदिर ,नारोशंकर मंदीर, सितागुंफा, अंजनेरी,सप्तश्रुंगी गड हे साडे तीन शक्तीपिठापैकी एक पीठ नाशिक येथे आहे,.

दरम्यान जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगनिवासिनीचे मंदिर असून या मंदिराचे एक प्रतिरूप म्हणून पंचवटीत सांडव्यावरची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर गोदावरीच्या काठावर वसले असून तीनशे वर्ष जुने आहे.

तसेच या मंदिराची देखभाल राजेबहादूर घराणे पाहत असल्याने यास ‘राजेबहाद्दरांची देवी’ म्हणूनही ओळखले जाते. येथे मंगळवार, शुक्रवार,पौर्णिमा, चैत्र नवरात्र, व शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हे मंदीर खूप जुने असल्याने येथे नेहमीच गर्दी बघायला मिळते. देवीची सेवा करणे हा सेवेचा भाग आहे असल्याचे मत येथील विश्वस्त राजेबहादूर यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील अनेक गावांत सप्तशृंगनिवासिनी देवीची मंदिरं स्थापन झालेली दिसून येतात. एकट्या नाशिक शहरात सप्तशृंगनिवसिनीची पन्नासपेक्षा अधिक मंदिरे आहेत. परंतु, त्या सर्व मंदिरांत पंचवटीतील गोदावरीच्या काठावरील ‘सांडव्यावरची देवी’ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.

(संकलन : पद्मिनी बोडके)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!