Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात आजपासून नवरात्रोत्सवाची धूम; जागर आदिशक्तीचा

Share

नाशिक : नवरात्रोत्सव अर्थात आदिशक्तीचा जागर आजपासून सुरू झाला असून आदिमाया, आदिशक्तीचा उत्सव अर्थात नवरात्रोत्सवाची  धूम शहरात पाहावयास मिळत आहे. ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांत तसेच घरोघरी आज घटस्थापना होत आहे. यामुळे शहरात आदिशक्तीचे, नवचैतन्याचे,उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील महत्वाचे देवी मंदिर म्हणून ओळख असलेल्या कालिका देवी मंदिरात पहाटे ३ वाजेपासून महापूजा करण्यात आली. घटस्थापने नंतर पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. प्रत्येक भाविकास दर्शन मिळावे यासाठी मंदिर व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज आहे. मंदिराबाहेर फुलांची रास अन भाविकांना देवीची आस पाहावयास मिळत आहे. फुलपात्र, पूजा साहित्य घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

दरवर्षी दर्शनासाठी भाविकांची जी झुंबड दिसून येई ते चित्र बदलतांना दिसून येत आहे. नवरात्रीचा पहिला रंग भगवा असून अनेक महिलांनी तसेच पुरुष वर्गाने भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हाच उत्साह आणि तेज आज भाविकांच्या चेहऱ्यावर झळकतांना दिसून येत आहे. अनेक भाविकांनी प्लास्टिक मुक्त नवरात्र साजरी करण्याचा देखील करण्याचा ध्यास धरला आहे .

(संकलन : जयश्री भामरे)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!