Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नवरात्रोत्सवामुळे रविवारपासून दोन मुख्य मार्ग बंद! वाहतूक मार्गात बदल

Share

नाशिक ।
नवरात्रौत्सव काळात भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, शहर वाहतूक शाखेने मुंबई नाका येथील कालिका मंदिर आणि भूगर येथील रेणुकादेवी मंदिर परिसराजवळील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी त्याबाबतची अधिसुचना काढली आहे.

रविवारी (दि.29) घटस्थापना होणार असून नाशिकची ग्रामदेवता कालिका देवीच्या मंदिरात यात्रा भरत असते. या ठिकाणी जिल्हाभरातून भाविक 24 तास येत असतात. तसेच भगूर येथील रेणूका माता मंदिराजवळही यात्रा भरत असल्याने तेथेही भाविकांचा गर्दी असते. या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी झाल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूक पोलिसांनी या दोन्ही मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. त्यानुसार रविवारी (दि.29) ते 8 ऑक्टोबर पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

वाहतूक शाखेकडून मोडक सिग्नल ते संदिप हॉटेल कॉर्नर दुतर्फा मार्ग, मनपा आयुक्त निवासस्थान ते भुजल सर्व्हेशन कार्यालय दुतर्फा मार्ग, चांडक सर्कल ते संदिप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदिप हॉटेल पर्यंतच्या मार्गावरील वाहतूक पहाटे 5 ते दुपारी बारा आणि दुपारी 3 ते रात्री बारापर्यंत बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून मोडक चौक सिग्नलवरून खडकाळी सिग्नल मार्गे 60 फुटी रोडने द्वारका सर्कलवरून नाशिकरोड व सिडकोच्या दिशेने जातील.

तसेच मुंबई नाक्याहून येणारी वाहतूक तुपसाखरे लॉन्स, हुंडाई शोरुम समोरून चांडक सर्कल, भवानी सर्कल मार्गे शहरात येईल. तर अंबड, सातपूर परिसरात जाणारी जड वाहतूक द्वारका सर्कलवरून गरवारे टी पॉइंटमार्गे सातपूर औद्योगिक वाहसतीत जातील. द्वारका सर्कलवरून पंचवटीत जाणारी जड वाहतूक कन्नमवार पुल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी हायस्कुल या मार्गाने पंचवटीत जातील. तर सारडा सर्कल कडून येणारी वाहतूक एन. डी. पटेल रोड, किटकॅट चौफुलीवरून मोडक सिग्नलमार्गे इतरत्र जाऊ शकेल.

त्याचप्रमाणे रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुकादेवी मंदिराजवळील परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. रेस्ट कॅम्प रोड हा चिंतामणी चौफुली ते नाका नंबर 2 भगूर पर्यंत या मार्गावरील वाहतूक पहाटे 5 ते सकाळी 11 आणि सायंकाळी चार ते रात्री 12 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे वाहतूकीस पर्यायी मार्ग म्हणून भगुर गावाकडून देवळाली कॅम्पकडे जाणार्या एसटी बसेस, रिक्षा व इतर वाहने चिंतामणी चौफुलीवरून उजवीकडे वळून आर्मीगेट चौफुली खंडेराव टेकडीरोड, पावर हाऊस टी पाँइट, शिगवेगाव मार्गे बार्न स्कुलकडून डावीकडून वळून लहवित रेल्वे वाय पाँइटच्या डावीकडे वळून नाका नंबर 2 कडून इतरत्र वाहतूक जाऊ शकेल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!