Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : घोटी परिसरात राष्ट्रीय एमआरएफ रॅलीचा थरार

Share

नाशिक : नाशिक एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय दुचाकी स्पर्धेची तिसऱ्या फेरीला घोटी येथे थरारक सुरवात झाली आहे.
बाईक रेसिंग प्रेमींसाठी हि संधी ए डब्लू इव्हेंट्सतर्फे देण्यात आली असून घोटी येथील निसर्गरम्य परिसरात हा थरार होत आहे.

या बाइक रेससाठी घोटी परिसर रविवारी तरुणाईच्या गर्दीने फुलला असून ग्रामीण भागातील लोकांसाठी पर्वणीच झाली आहे. अडथळ्यांची शर्यत पार करीत चॅम्पयिन ठरण्यासाठी धडपडणारे देशभरातील अव्वल बाइक रायडर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते.

(सर्व फोटो : सतीश देवगिरे)

इगतपुरी, घोटीसह परिसरात यंदा पावसाने चांगली सुरवात केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना निसर्ग रम्य वातावरणाबरोबरच रॅलीचा थरार अनुभवयास मिळणार आहे. या रॅलीचे एकूण अंतर ९८ किंलोमीटरचे असून याच मार्गावर प्रत्येकी चारवेळा स्पर्धक येजा करतील.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!