स्वाईन फ्लूचा जोर कायम ; जिल्हा रूग्णालयात 4 रूग्ण

0
 नाशिक : जिल्हाभरात स्वाईन फ्लुचा जोर वाढत असून जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र स्वाईन फ्ल्यु कक्षामध्ये चार रुग्ण दाखल असून यापैकी दोघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
यामध्ये एका बाळंत झालेल्या महिलेचाही समावेश आहे. यंदा फेबु्रवारीपासून स्वाईन फ्लूचा जोर वाढत गेला. गेल्या चार महिन्यांमध्ये स्वाईन फ्लुमुळे जिल्ह्यात 29 पेक्षा अधिक रुग्णांचा बळी गेला आहे.

यामध्ये ग्रामिण भागातील रूग्णांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून स्वतंत्र स्वाईन फ्ल्यु कक्ष सुरू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*