नाशिकच्या मंजिरी असनारे-केळकर यांना मानाचा ‘गानसरस्वती पुरस्कार’ जाहीर

0
नाशिक | संगीत क्षेत्रात गानसरस्वती म्हणून गौरव झालेल्या दिवंगत किशोरीताई अमोणकर यांच्या स्मृतीपित्यर्थ जाहीर करण्यात आलेला पहिला गानसरस्वती पुरस्कार नाशिकच्या प्रसिद्ध शास्रीय गायिका मंजिरी असनारे-केळकर यांना जाहीर झाला आहे.

शास्रीय संगीतातील पुरस्कार पहिल्यांदाच नाशिककर गायिकेला मिळाल्याने नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

किशोरी अमोणकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीपित्यर्थ हा पुरस्कार पुण्यात पुढील वर्षी फेब्रुवारीत गानसरस्वती संगीत महोत्सवात प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतातील वयवर्ष ५० च्या आतील शास्रीय कंठसंगीत जोपासणाऱ्या कलाकारास गानसरस्वती पुरस्कार दिला जाणार असल्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे दिवंगत किशोरी अमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य अरुण द्रविड यांनी सांगितले आहे. त्यानुसार येत्या फेब्रुवारीपासून या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

मंजिरी असनारे-केळकर यांनी कोल्हापूर विद्यापीठातून संगीताचे शिक्षण पूर्ण केले आहे. सांगलीतील सी. टी. म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. जयपूरच्या अत्राली घराण्याचे पं. एम. एस. कानेटकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहेत.

त्यांनी आतापर्यंत स्वामी गंधर्व पुरस्कार समारोह पुणे, आयटीसी संगीत समारोह कलकत्ता, पंडीत पलुस्कर समारोह दिल्ली, शंकरलाल फेस्टीव्हल दिल्ली, व्होमॅड फेस्टीव्हल अस्ट्रोलिया, न्यू झीलंड, बीबीसी प्रॉम्प फेस्टीव्हील लंडन, दरबार फेस्टीव्हल लंडन संगीत समारोह अशा विविध ठिकाणी संगीताचे कार्यक्रम केले आहे.

यांची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. आतापर्यंत त्यांच्या तीन शास्त्रीय संगीताच्या सिडीज प्रसिद्ध झालेल्या आहेत.

मंजिरी असनारे-केळकर यांना पं.कुमार गंधर्व पुरस्कार

LEAVE A REPLY

*