माजी मंत्री ए. टी. पवार अनंतात विलीन

0

कळवण: माजी मंत्री आणि आमदार ए. टी. पवार यांच्यावर आज दुपारी बारा वाजता त्याच्या कळवण तालुक्यातील मूळगावी दळवट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री मधुकर पिचड, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार जयंत जाधव श्रीराम शेटे आदींची उपस्थिती होती.

काल(दि.१०) आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे ए. टी. पवार यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी मागणी केली होती.

Photo Gallery : आठवणीतले ए. टी. पवार ; अशी होती त्यांची राजकीय कारकीर्द

ए. टी. पवार नाशिक जिल्ह्यातील ‘पाणी’दार नेतृत्व

Blog : एटी पवार : पदाचा अभिमान नसलेला कृष्णनगरमधील साधा रहिवासी

माजी मंत्री व आमदार ए.टी. पवार यांचे मुंबईत निधन

LEAVE A REPLY

*