‘नाशिप्र’कडून केरळ पूरग्रस्तांना मदत

0

नाशिक । केरळ आपत्तीग्रस्तांसाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाकडून जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून त्या केरळमधील पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आल्या.

केरळ येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे केरळ राज्यवार संकट आले होते. त्यासाठी मदत म्हणून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलतील जु. स. रुंग्टा हायस्कूल, पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालय, मोहिनीदेवी रुंग्टा प्राथमिक विद्यामंदिर, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, माध्यमिक विद्यालय पिंपळद, नाइट हायस्कूल, नाशिक यांच्याकडून केरळ पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली.

केरळ येथे पुरामुळे झालेल्या आपत्तीमुळे तेथे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला आहे, हे लक्षात घेऊन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलतील शाळांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेऊन केरळ येथील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला.

नाशिप्र मंडळाच्या वतीने मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी संस्थेतील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन केरळ पूरग्रसांसाठी मदतीचे आवाहन केले होते. नाशिप्र मंडळाला 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. संस्था अशा आपत्कालीन घटना देशात घडल्यास कायमच धावून गेलेली आहे. त्याप्रमाणे ही संकलित करून मदत पूरग्रस्तांना पाठवण्यात आली.

LEAVE A REPLY

*