Type to search

नाशिक

पोलीस क्रेडिट सोसायटीत ‘परिवर्तन’; तरूण नेतृत्वावर पोलीसांचाही विश्वास

Share

नाशिक । प्रतिनिधी
तब्बल 69 वर्षांनंतर झालेल्या नाशिक पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ पॅनलने एकहाती सत्ता काबीज केली. तर विरोधातील सहकार आणि प्रगती पॅनलचा धुव्वा उडाला. पोलीसांनीही तरूण नेतृत्वावरच विश्वास दाखवल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक पदांसाठी 1950 नंतर यंदा प्रथमच निवडणूक घेण्यात आली. पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटीच्या 4 हजार 692 मतदारां पैकी 2 हजार 971 सभासदांनी मतदान केले. शहरातील मतदान केंद्रावर 3 हजार 105 पैकी 1 हजार 218, तर तालुक्यातील केंद्रांवर 1 हजार 587 पैकी 1 हजार 53 मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत मतदारांनी परिवर्तन पॅनलला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या सहकार आणि प्रगती पॅनलमध्ये वरिष्ठ पोलिस कर्मचार्‍यांची, तर परिवर्तन पॅनलमध्ये तरुण पोलिसांची संख्या जास्त होती.

त्यामुळे निवडणुकीच्या निकालावरुन सभासदांनी वरिष्ठ पोलिसांच्या पॅनलला नकार देत, तरुणांच्या हाती सत्ता दिल्याचे स्पष्ट झाले. सोसायटीसाठी जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर रविवारी मतदान झाले. त्यानंतर सोमवारी मतमोजणी करण्यात आली. सकाळी 8 वाजता सुरु झालेल्या मतमोजणीत पहिल्यापासूनच परिवर्तन पॅनल अघाडीवर होते. अखेरीस मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर परिवर्तन पॅनल सर्वच्या सर्व जागांवर आघाडी घेऊन विजय झाले. विरोधी सहाकार व प्रगती पॅनलला खातेही उघता आले नाही.

विजयी उमेदवार त्यांना मिळालेली मते
खुला गट : विक्रम कडाळे (1 हजार 488), विनोद खांडबहाले (1 हजार 369), समाधान गवळी (1 हजार 620), प्रकाश गायकवाड (1 हजार 319), सतिश घाडगे (1 हजार 154),विक्रम चासकर ( 1 हजार 203), कपालेश्वर ढिकले (1 हजार 539), हेमंत तुपलोंढ (1 हजार 375), गणेश पिंगळे ( 1 हजार 441), संजय सपकाळे (1 हजार 56)

राखीव महिला : योगिता काकड (1 हजार 733), सोनम काथवटे (1 हजार 365)
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग : हनुमंत महाले (1 हजार 362)
इतर मागास प्रवर्ग : सचिन नेरकर (1 हजार 332).
भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग : निलेश कातकाड (1 हजार 455)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!