Type to search

क्रीडा

हकीम मर्चंट ट्रॉफी १९ वर्षाखालील स्पर्धेमध्ये नाशिक जिमखाना विजेता

Share

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व मेसन डेव्हलपर्सचे शब्बीरभाई मर्चंट यांच्या सहकार्याने आयोजित १९ वर्षाखालील हाकीम मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिक जिमखाना संघाने एसजीसीए संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज सकाळी शब्बीरभाई मर्चंट यांच्या हस्ते नाणेफेक करत सामन्यास सुरुवात करण्यात आली. एसजीसीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली व निर्धारित ५० षटकांच्या खेळांमध्ये ४७ षटकात सर्वबाद १४७ धावा केल्या.

तनय कुमार ने नाबाद ३५ धावा केल्या. रोशन वागसरे व स्वप्निल शिंदे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. उत्तरादाखल नाशिक जिमखाना संघाने रितेश तिडके नाबाद ६२ व यशराज खाडे ४१ यांच्या उत्कृष्ट फलंदाजी मुळे ४६ षटकात ६ बाद १५० धावा करत ४ गडी राखून एसजीसीए संघाचा पराभव करत १९ वर्षाखालील हकीम मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गेल्या महिन्यातच हकिम मर्चंट ट्रॉफीच्या वरिष्ठ गटातील विजेतेपद नाशिक जिमखाना संघाने पटकावले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!