२० सप्टेंबरला नासिक जिमखाना बुद्धिबळ स्पर्धा

0

नाशिक : नासिक जिमखाना आयोजित बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार दि. २० सप्टेंबर २०१८ रोजी नासिक जिमखाना, शिवाजी रोड येथे होणार आहे. या स्पर्धा वय वर्षे ९ व १५ वर्षाखालील वयोगटात होणार आहेत. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी १८ सप्टेंबर २०१८ पर्यंत नासिक जिमखाना, नाशिक शिवाजी रोड, नाशिक येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये आपल्या प्रवेशिका संस्थेच्या कार्यालयात दयाव्यात अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र छाजेड, मानद सचिव श्री. राधेश्याम मुंदडा, सह सचिव श्री. शेखर भंडारी यांनी दिली. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संस्थाचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळ यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेम सेक्रेटरी झुलकरनैन जागिरदार व स्पर्धचे प्रमुख पंच श्री. मंगेश गंभिरे हे प्रयत्नशिल आहेत.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संस्थाच्या कार्यालयात दुरध्वनी क्रमांक ०२५३-२५८१०८९ अथवा मो. ७०३८८९३६२९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*