Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकची ग्रीन जिम युरोपात

Share

किशोर चौधरी : प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपली काळजी घेत असतो. शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम योगासने करत असतो. त्याची आज नितांत गरज आहे. वाढत्या प्रदूषणामुळे व्यायाम करण्यासाठी अनेक लोक मिळेल त्या ठिकाणी मोकळ्या हवेत, बंदिस्त जिममध्ये, व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी जात असतात. पण मोकळ्या हवेत राहून जिमचा उपयोग करून घेण्यासाठी सर्वजण आतुरलेले असतात. यासाठी लागतात ती साधने. याच साधनांच्या माध्यमातून ग्रीन जिमची संकल्पना पुढे आली ती नाशिकमध्येच. याचे श्रेय जाते जाधव बंधू व ‘सॅनसन’ इंडस्ट्रीज अर्थात राजेंद्र जाधव व स्वर्गीय संजय जाधव यांच्या मेहनतीला.

चांदवडच्या छोट्याशा गावातून 300 रुपये भांडवल घेऊन नाशिक शहरात फेब्रिकेशन काम सुरू करणार्‍या जाधव बंधुंनी पुढे विदेशातील मोकळ्या ग्रीन जिमची संकल्पना साक्षात उतरवली. इंदिरानगर, नाशिक मनपा, शाळा, महाविद्यालये, उद्याने, वनविभाग, नगरपालिकामधून महाराष्ट्रातील शहरांबरोबरच देशातील राज्यांमध्ये व आता युरोप खंडात मराठी माणसाने ग्रीन जिमचे बस्तान बसवले आहे.

चीनसारख्या प्रगत राष्ट्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्रीन जिमची ठेवलेल्या किमतीपेक्षा जाधवांनी कमी किमत ठेवत त्यांनाही मागे टाकले आहे. ‘सॅनसन’ने मंदीच्या काळातही आपली उत्पादन क्षमता चांगली ठेवून भरभराट सुरू ठेवली होती. कोलकाता, बंगळुरूपासून उरली येथे उत्पादन सुरू केले आहे.

मंदीच्या काळात ब्रिटनमध्ये ‘द ग्रेट आऊटडोअर’ ही सुद्धा बाहेर पडण्याच्या स्थितीत असताना ‘सॅनसन’ने सुचवलेल्या आधारावर कंपनीचे अधिकारी मॅथ्यू यांनी अंबडला भेट देत कौतूक करीत आपली कंपनी पुन्हा सुस्थितीत नेली आहे. यावरून ‘सॅनसन’ची गुणवत्ता व नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने देशाचे व नाशिकच्या नावलौकिकात भर पडली आहे. सुखिन: संतु… हे सूत्र स्वीकारून जगभर मराठी पाऊल पुढे चालले असल्याने उत्तुंग भरारी घेत नावलौकिक होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!